मित्रांनो, महाराष्ट्र सरकार नेहमीच गरीब आणि गरजू लोकांसाठी चांगल्या योजना आणत असते. अशाच एक खास योजनेचं नाव आहे “मोफत भांडे संच योजना”. ही योजना खास बांधकाम कामगारांसाठी आहे.
या योजनेत सरकार कामगारांच्या कुटुंबाला स्वयंपाक आणि घरगुती कामांसाठी लागणारे भांडे सेट अगदी मोफत देत आहे. हा भांडे संच मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
या योजनेची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली आणि आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात कामगारांना ३० वेगवेगळ्या वस्तूंचा पूर्ण भांडे संच दिला जातो. या वस्तूंची किंमत बाजारात साधारणपणे १५,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत असते, पण सरकार हे सर्व सामान मोफत देत आहे.
या संचात ताट, वाट्या, ग्लास, पातेले, भातवाडी, मोठा चमचा, पाण्याचा जग, मसाल्याचा डब्बा, परात, कुकर, कढई आणि अजून बर्याच वस्तूंचा समावेश आहे.
ही योजना मिळवण्यासाठी काही अटी आहेत –
- अर्जदार महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असावा.
- कामगाराकडे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे.
- त्यांचे कार्ड सक्रिय (Active) असावे.
अर्ज करताना काही कागदपत्रे लागतात जसे की – आधार कार्ड, कामगार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, वार्षिक उत्पन्न दाखला, ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी.
नोंदणीसाठी तुम्हाला https://mahabocw.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे “Workers Registration” वर क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे. नंतर कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे.
नोंदणी झाल्यानंतर भांडे संच कुठे आणि कधी मिळणार याची माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कामगार सुविधा केंद्रात किंवा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात चौकशी करू शकता. अनेक ठिकाणी भांडी वाटप सुरू झाले आहे.
ही योजना खरंच बांधकाम कामगारांसाठी मोठी मदत आहे, कारण यात त्यांना घरासाठी आवश्यक सर्व भांडी अगदी मोफत मिळतात.